ई-केवायसी नसेल तर थांबेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता!

ई-केवायसी नसेल तर थांबेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १९ :- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना मोठा प्रकार समोर आला आहे. या योजनेत शासकीय सेवेत असलेल्या महिला, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे तब्बल १४ हजारांहून अधिक पुरुषांनीही या योजनेचा फायदा घेतल्याचे उघड झाले.

सध्या २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी जवळपास २७ ते २८ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू बहिणींच्याच खात्यात पैसे जमा व्हावेत यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी न केलेल्या महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

कशी कराल ई-केवायसी प्रक्रिया?

1. https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2. ई-केवायसी बॅनरवर क्लिक करून आधार क्रमांक टाका.

3. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.

4. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्यांचा ओटीपी भरावा लागेल.

5. पुढील टप्प्यात घोषणापत्र सादर करावे लागेल –

आपण कोणत्याही सरकारी सेवेत नसल्याची खात्री.

कुटुंबातील फक्त दोन महिलाच (एक विवाहित व एक अविवाहित) योजनेचा लाभ घेत आहेत याची नोंद.

6. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ई-केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश मिळेल.

सरकारने स्पष्ट केले आहे की, फक्त पात्र लाभार्थ्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

"गरजू बहिणींना वेळेत हक्काचा लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी करणे आता बंधनकारक ठरणार आहे."