इद्रीस मुलतानींची मागणी मान्य! फडणवीस सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यास हिरवा कंदील

इद्रीस मुलतानींची मागणी मान्य! फडणवीस सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यास हिरवा कंदील

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १४ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांना आज महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत ग्रामविकास विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या सुधारणेमुळे समाजाभिमुख कार्यकर्त्यांना ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधित्व वाढेल,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.