"इद्रीस मुलतानी यांचा भाजप स्टार प्रचारकांमध्ये समावेश; राज्यात नेतृत्वाची मोठी जबाबदारी!"

"इद्रीस मुलतानी यांचा भाजप स्टार प्रचारकांमध्ये समावेश; राज्यात नेतृत्वाची मोठी जबाबदारी!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि १२ :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने ‘स्टार प्रचारकांची यादी’ जाहीर केली आहे. या यादीत इद्रीस मुलतानी यांचा समावेश झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि पक्षकार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपकडून राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी निवड झाल्याने इद्रीस मुलतानी यांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्यांच्या प्रखर नेतृत्व, संघटन कौशल्य आणि समाजकार्यातील योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

या नियुक्तीबद्दल समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटिल साळवे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की,

 "इद्रीस मुलतानी हे पक्षनिष्ठ, लोकाभिमुख आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना मिळालेली जबाबदारी नक्कीच पक्षाला बळ देणारी ठरेल."

इद्रीस मुलतानी यांनी स्वतःही पक्षाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत “पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी राज्यभर कार्यरत राहीन” असं सांगितलं.