राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत श्रुतिका बोळगे आणि प्रथमेश म्हस्के यांची बाजी; मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मान!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय, एन-७ सिडको येथील दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कु. श्रुतिका बोळगे आणि कु. प्रथमेश म्हस्के यांनी तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक मिळवून शाळेचा तसेच शहराचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आयुक्त अमोल येडगे यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, कार्यक्रमाधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक मनोज अग्रवाल, क्रीडा समन्वयक सागर मगरे तसेच क्रीडा निदेशक प्रीतीश सराटे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित