अनिस पटेल यांचा सत्कार; जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल गौरव

अनिस पटेल यांचा सत्कार; जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल गौरव
अनिस पटेल यांचा सत्कार; जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल गौरव

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ जुलै :– जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी अनिस पटेल यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. शादाब अब्दुल शेख यांनी आपल्या निवासस्थानी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

या सत्कार कार्यक्रमाला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफभाई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद चाऊस, शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, तसेच शेख कैसे बाबा, सय्यद फराज अबेदी, डॉ. फैसल शेख, नाझीम आश्रफी, डॉ. नवीद खान, मजाज खान, शेख अशर, डॉ. साजिद अन्सारी, रईस शेख, सलीम खान, सय्यद फैयाजुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी अनिस पटेल यांचा पुष्पगुच्छ देऊन, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत, संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वासाठी काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाची दमदार एन्ट्री – अनिस पटेल यांना शुभेच्छा!