200 मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; आमदार चेतन तुपेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

"कोंढवा खुर्दमध्ये सत्तेचा नवा संदेश!"

200 मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; आमदार चेतन तुपेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन
200 मुस्लिम बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; आमदार चेतन तुपेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्र वाणी न्युज

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग) दि १ जुलै :- कोंढवा खुर्द परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला मोठा बळकटी देणाऱ्या घडामोडीत तब्बल 200 मुस्लिम बांधवांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीत भरघोस प्रतिसाद मिळाला.

या प्रवेश सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जनसेवक अल्ताफ शेख यांनी केलं होतं. गेली दोन दशके समाजात जात-पात न पाहता कार्यरत असलेल्या अल्ताफ शेख यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत आमदार तुपे म्हणाले, "कोंढवा भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. कब्रस्तानसमोरील रस्ताही अल्ताफ शेख यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला. भविष्यातही निधी कमी पडू देणार नाही."

या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 27 येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व शाखेचे उद्घाटनही आमदार तुपेंच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, युवा नेते पै. प्रसाद बाबर, अमोल हुळवळे, अनिस शेख, निता गवळी, फराना व हमजा शेख यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन निता गवळी यांनी तर आभारप्रदर्शन उपाध्यक्षा हमजा शेख यांनी केलं.

अल्ताफ शेख म्हणाले, "राजकारण न करता समाजकारण हाच माझा ध्यास आहे. चेतन तुपे यांच्या कार्यशैलीला प्रभावित होऊन मी या भागात प्रामाणिकपणे कार्य करत राहणार आहे."

"शब्द नाही, कामात बोलू; आणि कामातूनच विश्वास जिंकू!" – राष्ट्रवादी काँग्रेसचा जनतेसमोर नवा निर्धार.