"1600 रुग्णांची मोफत तपासणी! महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद!जे.जे. प्लस हॉस्पिटल, छ. संभाजीनगर

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ जून :- शहरात बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थएंड आणि जे.जे. प्लस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
दि. 21 व 22 जून 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जे.जे. प्लस हॉस्पिटल येथे हे शिबिर सुरू असून, पहिल्याच दिवशी तब्बल 1600 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, ईसीजी, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, मेंदू विकार, किडनी यांसारख्या महागड्या तपासण्या व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पूर्णपणे मोफत केले जात आहेत.
या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्राचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांच्या हस्ते पार पडले.
पहिल्या दिवशी शहरातील महिला, पुरुष, तरुण, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचा शिबिरात मोठा सहभाग दिसून आला. विशेष बाब म्हणजे, तपासणीबरोबरच औषधेही मोफत देण्यात येत असून, रुग्णांसाठी अल्पोपहाराची सोय सुद्धा केली आहे.
ज्यांना कालच्या दिवशी येणे शक्य झाले नाही, त्यांनी आज 22 जून रोजी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमातून आरोग्य सेवा गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुसज्ज रित्या पार पाडले जात असून, डॉक्टर व सामाजिक संस्थांचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.