५० हजार शेतकरी-कामगारांचा महाआक्रोश! चारोटी ते पालघर ‘लाल लाट’ – मागण्या मान्य होईपर्यंत ठाण मांडणार

५० हजार शेतकरी-कामगारांचा महाआक्रोश! चारोटी ते पालघर ‘लाल लाट’ – मागण्या मान्य होईपर्यंत ठाण मांडणार
५० हजार शेतकरी-कामगारांचा महाआक्रोश! चारोटी ते पालघर ‘लाल लाट’ – मागण्या मान्य होईपर्यंत ठाण मांडणार

महाराष्ट्र वाणी 

पालघर (प्रतीनीधी) दि. १९ :- शेतकरी, कामगार, आदिवासी आणि सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या नेतृत्वाखाली आज पालघर जिल्ह्यात इतिहास घडला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आलेल्या सुमारे ५०,००० नागरिकांचा अतिभव्य पायी मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, हा जनसमुदाय सरकारविरोधात निर्धाराने रस्त्यावर उतरला आहे.

हा मोर्चा आज रात्री मनोर येथे मुक्कामी थांबणार असून, उद्या थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे. सरकारने ठोस कालमर्यादेसह लेखी आश्वासन देईपर्यंत अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्याचा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या ऐतिहासिक आंदोलनात

**अखिल भारतीय किसान सभा (AIKS),

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU),

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (ADWA),

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI),

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)

आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (AARM)

या संघटनांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.

मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, विनोद निकोले, किरण गहला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते करत असून, उद्या विजू कृष्णन हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

 मोर्चाच्या प्रमुख मागण्या

वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी

कसणाऱ्यांच्या नावावर जमीन हक्क

मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे

स्मार्ट मीटर योजना रद्द

पेसा कायद्याची अंमलबजावणी

चार श्रम संहिता रद्द

वाढवण व मुरबे बंदर प्रकल्प रद्द

पिण्याचे व सिंचनाचे पाणी

शिक्षण, रोजगार, रेशन व आरोग्य सुविधांमध्ये वाढ

✊ लाल झेंडे, जनसमुदाय आणि निर्धाराच्या घोषणांनी पालघरचा परिसर दणाणून गेला असून, “हक्क मिळेपर्यंत माघार नाही” हा आवाज आता शासनाच्या दारात पोहोचला आहे.