१०वी पाससाठी मोठी संधी! भारतीय नौदलात ११०० हून अधिक पदांची भरती सुरू; अर्ज कसा करायचा, पात्रता काय? जाणून घ्या
भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी चालून आली आहे. दहावी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी

महाराष्ट्र वाणी न्युज
Indian Navy Recruitment 2025 (INCET 01/2025) – भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी चालून आली आहे. दहावी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी नौदलात नागरी गट 'क' अंतर्गत १,१०० पेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी ५ जुलैपासून अर्ज भरायला सुरूवात केली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२५ आहे.
रिक्त पदांमध्ये समावेश –
ट्रेड्समन मेट, चार्जमन, सीनियर ड्राफ्ट्समन यासह विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांचा समावेश आहे. ही भरती नौदलाच्या किनारपट्टीवरील युनिटसाठी असून केंद्र सरकारच्या संरक्षण सेवेत काम करण्याची नामी संधी आहे.
पात्रता व वयोमर्यादा –
शैक्षणिक पात्रता: पदानुसार १०वी/१२वी/ITI/डिप्लोमा/पदवी
वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे (पद व प्रवर्गानुसार सूट लागू)
अर्ज प्रक्रिया –
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अर्ज भरताना पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
शुल्क: सामान्य/OBC – ₹२९५ (SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही)
निवड प्रक्रिया –
CBT परीक्षा (१०० प्रश्न – सामान्य बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान – ९० मिनिटे)
कौशल्य चाचणी (पदानुसार)
कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
महत्त्वाच्या लिंक –
अधिकृत अर्ज लिंक: https://incet.cbt-exam.in
भरती पोर्टल: https://www.joinindiannavy.gov.in
अर्जाची अंतिम मुदत: १८ जुलै २०२५
शेवटच्या दिवशी गर्दीमुळे अडचणी टाळण्यासाठी आजच अर्ज करा!
अधिक रोजगार विषयक अपडेटसाठी आम्हाला फॉलो करत रहा!