स्थानिक स्वराज्य संस्थांत नवतरुणांना संधी देणार – प्रा. राहुलकुमार ताठे
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड दि १६ :- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जास्तीत जास्त नवतरुणांना संधी दिली जाणार आहे,” अशी घोषणा तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे यांनी केली.
सिल्लोड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीत ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणासाठी पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याची माहितीही देण्यात आली.
प्रा. ताठे म्हणाले, “तालुक्यातील भाजप आणि शिंदे गट हे वेगळे लढणार असल्याचं सांगत असले तरी ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, कामगार आणि कष्टकरी यांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. अतिवृष्टी, कर्जमाफी, हमीभाव, रोजगार निर्मिती या सर्वच आघाड्यांवर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.”
या बैठकीला अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक, माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव, ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील कळम, किसान सेल जिल्हाध्यक्ष हरीदास शेलार, जिल्हा सरचिटणीस राहुल सुरडकर, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पांढरे, संघटक शेख सरफराज, अल्पसंख्याक अध्यक्ष शाकीर पठाण, युवक अध्यक्ष शंकर मानकर, युवक कार्याध्यक्ष दादाराव गोडसे, विद्यार्थी अध्यक्ष सतीश गोरे, तसेच उत्तमराव ताठे, द्वारकादास फरकाडे, विशाल कांबळे, रंगनाथ श्रीखंडे, जयराज जिवरग, दत्ता मैंद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
✨ “नव्या पिढीला राजकारणात संधी मिळाल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही, आणि ते परिवर्तन घडवण्याची तयारी राष्ट्रवादीची आहे!
्” ✨