‘सेल्फ-स्टडी’वर घवघवीत यश; जायन्ट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांतील गुणवंतांचा भव्य सत्कार

‘सेल्फ-स्टडी’वर घवघवीत यश; जायन्ट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांतील गुणवंतांचा भव्य सत्कार
‘सेल्फ-स्टडी’वर घवघवीत यश; जायन्ट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांतील गुणवंतांचा भव्य सत्कार
‘सेल्फ-स्टडी’वर घवघवीत यश; जायन्ट्स ग्रुपतर्फे मनपा शाळांतील गुणवंतांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ : खासगी शिकवणीचा कोणताही आधार न घेता केवळ स्व-अभ्यासाच्या जोरावर दहावी परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या महानगरपालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जायन्ट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगरतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. हॉटेल रेड वेलव्हेट येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.

या प्रेरणादायी सोहळ्यास मनपाचे शिक्षण उपायुक्त पांढरे सर, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे आणि शिक्षण विस्तार अधिकारी रईसा बेगम खान यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि मुख्य प्रायोजक केशवभाई पटेल यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेली उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, अंधत्वावर मात करत सिडको एन-७ मनपा शाळेतील कु. तनुजा रगडे या विद्यार्थिनीने ८०.६० टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली. तिच्या जिद्दीला सलाम करत तिला विशेष रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या प्रकल्पाचे नियोजन आणि सूत्रसंचालन माजी अध्यक्षा व प्रकल्प प्रमुख पूजा विठोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशासाठी ग्रुपचे अध्यक्ष देवेंद्र शेठ, प्रशासन संचालक (DOA) विष्णू राऊत यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ — प्रेरणादायी यशकथा आणि समाजातील सकारात्मक घडामोडी सर्वात आधी!