सिल्लोडमध्ये शिवसेनेतर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी; आमदार अब्दुल सत्तार यांचे ‘80 टक्के समाजकारण’वर भर

सिल्लोडमध्ये शिवसेनेतर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी; आमदार अब्दुल सत्तार यांचे ‘80 टक्के समाजकारण’वर भर
सिल्लोडमध्ये शिवसेनेतर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी; आमदार अब्दुल सत्तार यांचे ‘80 टक्के समाजकारण’वर भर

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड दि २३ :- येथे तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिल्लोड शहरातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण” हा मूलमंत्र आजही शिवसेनेची दिशा ठरवणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, हेच शिवसेनेचे खरे कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचे आवाहन केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत शिवसेना सदैव सामान्य माणसाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

— विचारांचा वारसा जपत शिवसेनेची समाजाभिमुख वाटचाल कायम आहे!