सिल्लोडमध्ये नवे नेतृत्व जोशात! नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा थाटात पदग्रहण सोहळा, विठ्ठल सपकाळ उपनगराध्यक्ष
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड, दि. १३ :- सिल्लोड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा पदग्रहण सोहळा दिनांक १२ रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. याचवेळी उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल दादा सपकाळ यांची निवड करण्यात आली.
या सोहळ्यात स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया देखील पार पडली. नंदकिशोर सहारे, सागर (विशाल) जाधव व शेख बाबर यांची स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
सिल्लोड नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित या पदग्रहण सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार यांनी आवर्जून उपस्थिती लावली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, स्वीकृत सदस्य व नगरसेवकांना त्यांनी शुभेच्छा देत विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.
पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगरपरिषद कार्यालय पुष्पमाळांनी सजवण्यात आले होते. तुतारी, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
👉 सिल्लोडच्या विकासासाठी नवे नेतृत्व सज्ज असल्याचा संदेश या सोहळ्यातून स्पष्टपणे उमटला.