सायनमध्ये दहीहंडी जल्लोष; राष्ट्रवादी महिला काँग्रेस व ओणार फाउंडेशनतर्फे आयोजन

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १३ :- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आणि ओणार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. मृणालिनी तुषार म्हसकर (मुंबई उपाध्यक्ष महिला / उत्तर-मध्य मुंबई जिल्हा समन्वयक) यांच्या पुढाकाराने पारंपरिक दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जन्माष्टमी निमित्त शनिवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सायन चुनाभट्टी येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल समोर रंगणार आहे.
फक्त चार थरांच्या सलामीसह होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक गोविंदा पथकाला सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, “उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा” या घोषवाक्याखाली जल्लोष साजरा केला जाणार आहे.