"वय फक्त १३ वर्षे, पण प्रश्न थेट शिक्षण व्यवस्थेला; झैन अकदस हैदर सोशल मीडियावर व्हायरल"

"वय फक्त १३ वर्षे, पण प्रश्न थेट शिक्षण व्यवस्थेला; झैन अकदस हैदर सोशल मीडियावर व्हायरल"
"वय फक्त १३ वर्षे, पण प्रश्न थेट शिक्षण व्यवस्थेला; झैन अकदस हैदर सोशल मीडियावर व्हायरल"

महाराष्ट्र वाणी (रांची झारखंड) 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान झोपडपट्टीतून आलेल्या मोहम्मद इरफान या तरुणाने आपल्या आक्रमक पण संयमी भूमिकेमुळे देशभरात ओळख निर्माण केली होती. आता झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनातून अवघ्या १३ वर्षांच्या झैन अकदस हैदर या विद्यार्थ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सहावीत शिकणाऱ्या झैनने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न अत्यंत आत्मविश्वासाने मांडले आहेत. त्याच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि माध्यमांसमोर आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची शैली अनेकांना प्रभावित करत आहे.

मोहम्मद इरफान हा सामान्य कुटुंबातील तरुण असून त्याने आपल्या संघर्षमय आयुष्यातून वेगळी ओळख निर्माण केली. दुसरीकडे, झैन अकदस हैदर हा सुशिक्षित आणि आधुनिक वातावरणात वाढलेला मुलगा असल्याचे दिसते. मात्र, दोघांच्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या असल्या तरी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी व्यक्त केलेल्या चिंता आणि मागण्या मात्र सारख्याच आहेत.

अवघ्या १३ वर्षांच्या वयात झैनने माध्यमांसमोर दाखवलेला आत्मविश्वास आणि शिक्षण व्यवस्थेबाबत उपस्थित केलेले प्रश्न हे अनेक प्रौढांनाही विचार करायला भाग पाडत आहेत. सोशल मीडियावर त्याच्या वक्तृत्वाचे आणि जागरूकतेचे कौतुक होत असून, झैनसारख्या जागृत आणि संवेदनशील मुलांकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.