“वडिलांचा अभिमानाचा क्षण” — मुलाने गाठले यशाचे शिखर!

“वडिलांचा अभिमानाचा क्षण” — मुलाने गाठले यशाचे शिखर!
“वडिलांचा अभिमानाचा क्षण” — मुलाने गाठले यशाचे शिखर!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि१९ :- एका वडिलांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरलेली बातमी समोर आली आहे. मिर्ज़ा अबुल हसन अली याने Tata Institute of Social Sciences (TISS), मुंबई येथील 85 व्या दीक्षांत समारंभात Master of Arts (Social Work - Mental Health) ही पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे.

यासोबतच त्याने UGC-NET ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा देखील उत्तीर्ण करत आणखी एक मोठे यश आपल्या नावावर केले आहे. या दुहेरी यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

मिर्ज़ा अबुल हसन अली याने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि समाजसेवेप्रती असलेली निष्ठा याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजासाठी काम करण्याची त्याची तयारी आणि समर्पण विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

या यशाबद्दल वडील मिर्ज़ा अब्दुल कय्यूम नदवी व परिवाराने आनंद व्यक्त करत, “आम्हाला त्याचा अभिमान आहे. अल्लाह त्याला पुढेही मानवतेची सेवा करण्याची ताकद देवो आणि त्याचे भविष्य उज्ज्वल होवो,” अशा भावना व्यक्त केल्या.

👉 कष्ट, जिद्द आणि सेवाभाव असेल, तर यश नक्कीच पायाशी येते — मिर्ज़ा अबुल हसन अली याचे यश याचेच जिवंत उदाहरण!