‘वक्फ संपत्ती अपलोड’ मुदतवाढीसाठी AIMPLB ची केंद्रात धडक; किरेन रिजिजू यांची सकारात्मक हमी

‘वक्फ संपत्ती अपलोड’ मुदतवाढीसाठी AIMPLB ची केंद्रात धडक; किरेन रिजिजू यांची सकारात्मक हमी
‘वक्फ संपत्ती अपलोड’ मुदतवाढीसाठी AIMPLB ची केंद्रात धडक; किरेन रिजिजू यांची सकारात्मक हमी

महाराष्ट्र वाणी 

नवी दिल्ली दि १२ :- ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या वक्फ मालमत्ता अपलोड प्रक्रियेतील अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी करत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. UMEED पोर्टलवर वक्फ संपत्ती अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, अवास्तव वेळापत्रक आणि प्रलंबित कामाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने एक वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती केली.

मंत्री किरेन रिजिजू यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांकडे सकारात्मकपणे पाहत लवकरच योग्य आणि वेळेवर निर्णय देण्याची आश्वासक हमी दिली.

या शिष्टमंडळात AIMPLB चे उपाध्यक्ष सय्यद सदातुल्लाह हुसैनी, सरचिटणीस मौलाना मोहम्मद फजलुर रहीम मुजद्दिदी, खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी, खासदार रूहुल्ला मेहदी, खासदार मोहम्मद जावेद, मोहम्मद अदीब, मौलाना मोहम्मद हकीमुद्दीन कासमी, मुफ्ती अब्दुल रझाक, अॅड. फझील अहमद अय्यूबी, हकीम मोहम्मद ताहिर आणि अॅड. नबीला जमील यांचा समावेश होता.