वंचितच्या जनआक्रोश मोर्चातून RSS विरोधात घोषणाबाजी; सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात पोलिस आणि वंचित कार्यकर्ते आमनेसामने

राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांविरोधात मोर्चा • शहरात सुरक्षा तणाव • तरुणांचा प्रचंड सहभाग

वंचितच्या जनआक्रोश मोर्चातून RSS विरोधात घोषणाबाजी; सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात पोलिस आणि वंचित कार्यकर्ते आमनेसामने
वंचितच्या जनआक्रोश मोर्चातून RSS विरोधात घोषणाबाजी; सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात पोलिस आणि वंचित कार्यकर्ते आमनेसामने

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :– वंचित बहुजन आघाडीने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज भव्य ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्यात शहरातील अभ्यासू तरुण, कामगार, महिला आणि भीमसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नागरी हक्क आणि संविधानिक न्यायाची मागणी केली.

गुन्हे मागे घ्या – वंचितची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे तसेच आंबेडकरवादी तरुण कार्यकर्त्यांवर प्रतिकार दडपण्यासाठी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी जोरदार मागणी मोर्चात करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हे गुन्हे राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आले असल्याचा आरोप केला.

RSS कार्यालयाजवळ तणाव – पोलिस आणि कार्यकर्ते आमनेसामने

मोर्चा बाबा पेट्रोल पंपाजवळील RSS कार्यालयाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी मोर्चाला अडवले. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीचा स्तर उंचावताच काही काळ पोलिस आणि वंचित कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकले. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सुजात आंबेडकरांची उपस्थिती – मोर्चात नवचैतन्य

मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. त्यांच्या उपस्थितीने तरुण कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोम निर्माण झाला. मोर्चादरम्यान "RSS मुर्दाबाद", "संविधान बचाओ", "भीम सेना जिंदाबाद", "हुकूमशाही चालणार नाही" अशा घोषणांनी संपूर्ण औरंगाबाद दुमदुमून गेले.

सुजात आंबेडकर म्हणाले,

 "जो संविधानाला आव्हान देईल, तो कोणताही असो – त्याला लोकशक्तीने उत्तर दिले जाईल. भीमसैनिक एकत्र आहेत, अन्यायाविरोधात लढा सुरूच राहील."

मोर्चात शिस्तबद्ध सहभाग – महिलांचीही मोठी उपस्थिती

या मोर्चात शहरातील महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. काही तरुण विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दर्शवला. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण आणि संघटित पद्धतीने पार पडल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

 रस्त्यावर आज लोकशक्ती बोलली – हा फक्त मोर्चा नव्हता, हा संविधान व न्यायासाठी दिलेला इशारा होता!