मौलाना आझाद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र समन्वयकपदी डॉ. सोहेल झकीउद्दीन यांची नियुक्ती

“दोन पदव्या, एकाच वर्षात – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!”

मौलाना आझाद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र समन्वयकपदी डॉ. सोहेल झकीउद्दीन यांची नियुक्ती

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- मौलाना आझाद शिक्षण संस्था संचलित मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रोजा बाग येथे कार्यरत असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या समन्वयकपदी डॉ. सोहेल झकीउद्दीन (सहाय्यक प्राध्यापक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारुकी यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली. यावेळी डॉ. अथरुद्दीन कादरी यांच्या उपस्थितीत डॉ. झकीउद्दीन यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. मजहर अहमद फारुकी, उपप्राचार्य डॉ. आरेफ पठाण, डॉ. अथरुद्दीन कादरी, प्राचार्य प्रा. शेख इमरान रमजान, प्रा. कनिज फातेमा, डॉ. शेख शकील मजीद, डॉ. शेख सुभान हसन व डॉ. सय्यद रिजवानुद्दीन यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदर अभ्यास केंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत विविध अभ्यासक्रम चालवले जातात. सध्या बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. यूजीसीच्या नवीन नियमांनुसार विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमासोबतच मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोन पदव्या घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी वयाची कोणतीही अट नाही. दहावी किंवा बारावी नंतर शिक्षण अर्धवट सोडलेले, पण पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असलेले उमेदवार देखील या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी केंद्र समन्वयक डॉ. सोहेल झकीउद्दीन (मो. ९२७०४२३७८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

👉 शैक्षणिक संधीचे नवे दालन खुले – इच्छुकांनी त्वरित लाभ घ्यावा!