"मोहरम म्हणजे त्याग, बलिदान आणि निष्ठेची प्रेरणा" – आमदार किशोर जोरगेवार यांचे वक्तव्य

“मोहरमची प्रेरणा ही फक्त मुस्लिम समाजापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण मानवजातीसाठी एक शिकवण आहे,”

"मोहरम म्हणजे त्याग, बलिदान आणि निष्ठेची प्रेरणा" – आमदार किशोर जोरगेवार यांचे वक्तव्य
"मोहरम म्हणजे त्याग, बलिदान आणि निष्ठेची प्रेरणा" – आमदार किशोर जोरगेवार यांचे वक्तव्य

महाराष्ट्र वाणी न्युज 

चंद्रपूर दि ६ जुलै ( प्रतिनिधी) :– “मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो इमाम हुसैन यांच्या अन्यायाविरोधातील संघर्षाची, निष्ठेची आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे,” असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

मोहरमच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कारागृह परिसरातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्गा भाविकांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. या प्रसंगी आमदार जोरगेवार यांनी दर्ग्यावर चादर अर्पण करत नम्र अभिवादन केले.

या वेळी बोलताना त्यांनी इमाम हुसैन यांच्या शौर्याला आणि धर्मासाठी दिलेल्या बलिदानाला मानवंदना दिली. “मोहरमची प्रेरणा ही फक्त मुस्लिम समाजापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण मानवजातीसाठी एक शिकवण आहे,” असेही ते म्हणाले.

“चंद्रपूर जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. येथे सर्व धर्म, जाती आणि पंथ एकत्र नांदतात. सण-उत्सव हे सगळ्यांचे असून, ते एकमेकांच्या सन्मानाने साजरे केले जातात, हीच आपली खरी ओळख आहे,” असे उद्गारही जोरगेवार यांनी काढले.

या कार्यक्रमानंतर त्यांनी दर्शन घेत व्यवस्थेचीही पाहणी केली.

 एकत्रतेचा संदेश देणारा मोहरम — चंद्रपूरची सामाजिक सलोखा हीच खरी शक्ती!