मुकुंदवाडी पोलिसांचा मोठा ‘एक्शन’! 2.20 लाखांच्या 4 दुचाकी जप्त – सराईत ‘विसंवा’ टोळीचा पर्दाफाश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १८ :-
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत ‘विसंवा’ टोळीचा भांडाफोड करत तब्बल 2 लाख 20 हजार रुपयांच्या 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.
दि. 17/12/2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता विशेष पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित विसंवा याचा शोध घेण्यात आला. चौकशीत त्याने मुकुंदवाडी हद्दीत पंधरा दिवसांपूर्वी दोन तसेच अलीकडे आणखी दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून एकूण चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
🔹 जप्त केलेल्या दुचाकी :
1. हीरो डेस्टिनीग मोपेड – MH 20 GB 4764 (₹60,000)
2. हिरो होंडा स्प्लेंडर – MH 20 AF 4785 (₹50,000)
3. TVS वेगा मोपेड – MH 20 CJ 5404 (₹50,000)
4. हिरो होंडा फॅशन प्रो – विना क्रमांक (₹60,000)
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 422/2025 व 479/2025 अन्वये कलम 303(2) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हे दाखल असून, संबंधित चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत स्वामी, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केली.
विशेष पथकातील पोउपनि शिवाजी घोरपडे, सफौ/461 नरसिंग पवार, पोह/48 बाबासाहेब कांबळे, पोह/1433 गणेश वैराळकर, पोअं. 861 अनिल थोरे व 2624 गणेश वाघ यांनी ही धडाकेबाज कामगिरी बजावली.
— शहरातील दुचाकी चोरीवर पोलिसांचा करारा प्रहार, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन!