महिला डॉक्टरच्या अपमानाविरोधात महिला काँग्रेसचे क्रांती चौकात तीव्र आंदोलन! महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही; – दीपाली मिसाळ
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औंरगाबाद) दि १९ :- बिहार राज्याचे मुख्यमंत्री मा. नितीश कुमार यांनी एका महिला डॉक्टर भगिनीच्या चेहऱ्यावरील बुरखा (हिजाब) सार्वजनिक ठिकाणी स्वतः काढल्याची घटना समोर आली असून, या प्रकाराने महिलांच्या सन्मानावर व प्रतिष्ठेवर गंभीर आघात झाला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून, महिलांच्या मूलभूत अधिकारांवर थेट हल्ला असल्याचा आरोप महिला काँग्रेसने केला आहे.
या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी तसेच संबंधित प्रकरणात संविधानिक मार्गाने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शहर-जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष दीपाली मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिलांच्या सन्मानाचे रक्षण झालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना दीपाली मिसाळ म्हणाल्या की, महिलांवर होत असलेला अन्याय महिला काँग्रेस कदापि सहन करणार नाही. कोणत्याही महिलेला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देणे हे संविधानविरोधी असून, दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात इब्राहिम पठाण, डॉ. सरताज पठाण, डॉ. पवन डोंगरे, मशरूर खान, अहमद चाऊस, हाजी मोईन कुरेशी, मुदसिर अन्सारी, मिर्झा झकीर बेग, दिक्षा पवार, सलमा नाहीद, रेहाना शेख, रुबिना सय्यद, योगेश थोरात, अथर शेख, आमिर अब्दुल सलीम, निर्मला शिखरे, लियाकत पठाण, इम्रान पठाण, मयुर गायकवाड, सूफियान पठाण, सुमेध नन्नावरे, साहेबराव बनकर, फैज शेख, मंजू लोखंडे, वंदना जगताप, उषा पगारे, समीना सय्यद, उत्तम दणके, नजीर शेख, गौसिया शेख, आशिया तब्बसून, सबिना सय्यद आदींची उपस्थिती होती.
महिलांच्या सन्मानासाठी संघर्ष थांबणार नाही—न्याय मिळेपर्यंत महिला काँग्रेसचा आवाज बुलंद राहील.