मनपा निवडणूक २०२६ : बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या जाहीर सभा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४, २५, ११, १२ व १३ या प्रभागांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त जाहीर सभांचे काल दिनांक 12 रोजी आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते मा. श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकुंदवाडी, संजय नगर आणि कटकट गेट परिसरात या सभा यशस्वीरीत्या पार पडल्या.
या जाहीर सभांमध्ये बोलताना थोरात साहेबांनी लोकशाही, भारतीय संविधान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. सध्याच्या महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार, अपयशी कारभार आणि जनतेच्या विरोधात राबविण्यात येणाऱ्या धोरणांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या प्रश्नांवर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे अपयश स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी थोरात साहेबांनी छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आणि विकासदृष्टी मांडली. शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ठोस आणि जनहिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
सभेला मोठ्या संख्येने नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांची उपस्थिती लाभली. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा वाढता विश्वास पाहता २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा ठाम संदेश या सभांमधून देण्यात आला.
या वेळी खा. डॉ. कल्याण काळे, किरण पाटील डोणगावकर, कमल फारुकी, इब्राहिम पठाण, जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, मनोज शेजूळ, गजानन मते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाही व विकासासाठी काँग्रेस – हाच जनतेचा आवाज!
२०२६ मध्ये परिवर्तन निश्चित, असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.