भ्रष्ट मंत्र्यांचा गेम संपवा — शिवसेनेचा जळगावमध्ये जनआक्रोश मोर्चा

भ्रष्ट मंत्र्यांचा गेम संपवा — शिवसेनेचा जळगावमध्ये जनआक्रोश मोर्चा
भ्रष्ट मंत्र्यांचा गेम संपवा — शिवसेनेचा जळगावमध्ये जनआक्रोश मोर्चा

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव, दि. ११ :- शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या मागण्यांसाठी आज जळगावमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जनआक्रोश मोर्चा उसळला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात ‘भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा द्या!’ आणि ‘शेतकऱ्यांचा बंद पिक विमा पुन्हा सुरू करा!’ अशा घोषणा रणधुमाळी करत होत्या.

पण सर्वाधिक चर्चा झाली ती — जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या "पत्त्यांच्या डावाची"!

विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ‘रमेशचा गेम’ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आणि थेट रस्त्यावर उतरून पत्त्यांचा डाव मांडत निषेध केला.

मोर्चाचे नेतृत्व

शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला. यात माजी खासदार उमेश दादा पाटील, उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख नेता सांगोळे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाहीर पठाण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे (कुसुंबा), उपसरपंच प्रमोद घुगे (धरणगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

हजेरी लावलेले अन्य मान्यवर

निलेश चौधरी, फिरोज पठाण, शोएब खाटीक, किरण भावसार, निलेश ठाकरे, बाळा कणखरे, विजय बांदल, राहुल पार्क, विजय राठोड, जैनुद्दीन शेख, लखन सांगिले, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, पप्पू तायडे, राकेश माळी, बिरजू शिरसाठ, शरद पाटील, गोलू पाराये, राहुल खवडे, भगवान धनगर, गुलाबराव कांबळे, सचिन चौधरी, छगन खडसे, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, लोटन सोनवणे, प्रभाकर कोळी, योगेश चौधरी, आबा कोळी, राकेश घुगे, विनायक धर्माधिकारी, राजू जगताप, भीमराव पांडव यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सूत्रसंचालन व आभार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुरळकर यांनी केले, तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.