‘प्राईड ऑफ ह्यूमन राईट्स डिफेंडर’ पुरस्कार जाहीर; संपादक आजमत मोहम्मद पठाण यांचा गौरव

‘प्राईड ऑफ ह्यूमन राईट्स डिफेंडर’ पुरस्कार जाहीर; संपादक आजमत मोहम्मद पठाण यांचा गौरव

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९ :– मानवाधिकार संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक शब्दमतचे मुख्य संपादक आजमत मोहम्मद पठाण यांची निवड प्रतिष्ठित ‘प्राईड ऑफ ह्यूमन राईट्स डिफेंडर अवॉर्ड’ साठी झाली आहे. या पुरस्काराची अधिकृत घोषणा विश्व मानवाधिकार परिषद यांनी केली.

या सोहळ्यात पत्रकार, वकील, डॉक्टर, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : हज हाऊस, कलेक्टर बंगला परिसर, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दिनांक १० डिसेंबर

वेळ : दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत

संस्थेच्या वतीने आजमत मोहम्मद पठाण यांचे अभिनंदन करण्यात आले असून, “मानवाधिकार संरक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे,” असे परिषदेकडून सांगण्यात आले.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुनिल साळवे, विलास मगरे, बाबुभाई इनामदार, अजीज मिर्झा, सलमान पटेल, जावेद खान, शकिला पठाण, राजेंद्र ओडकर, फेरोज खान, बबन सोनवणे, अनिस शेख, मुख्तार बागवान, रहिम मिर्झा बेग, रहिम सर आदींनी शुभेच्छा दिल्या.