प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार धडाक्यात सुरू; आ.सतीष चव्हाण यांचे हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, ‘घड्याळ’ला मतदानाचे आवाहन

प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार धडाक्यात सुरू; आ.सतीष चव्हाण यांचे हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, ‘घड्याळ’ला मतदानाचे आवाहन
प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार धडाक्यात सुरू; आ.सतीष चव्हाण यांचे हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, ‘घड्याळ’ला मतदानाचे आवाहन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जोरदार ताकद दाखवली आहे. आज या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार सतीष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आमदार चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक २६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून

अ – श्रीमती नीता बाळासाहेब गायकवाड,

ब – श्री. विठ्ठलराव राजाराम काळे,

क – श्रीमती नीता बाळासाहेब भगुरे,

ड – श्री. फिरोज पटेल

हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून येत्या १५ तारखेला “घड्याळ” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार सतीष चव्हाण यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. दिलीप बनकर, शहराध्यक्ष श्री. अभिजित देशमुख, माजी सभापती श्री. महेश उबाळे, श्री. रविकांत राठोड, श्री. अनुराग शिंदे यांच्यासह पक्षाचे चारही उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून, प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार अधिक वेगाने आणि संघटितपणे राबवण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘घड्याळ’ला मतदान करा, असा संदेश देत राष्ट्रवादीने प्रचारात नवी ऊर्जा ओतली आहे.