नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत डॉ. हुमायू हाफिज इमरान यांना सुवर्णपदक; भारताचा मान उंचावला!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्राचे डॉ. हुमायू हाफिज इमरान यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.
बीडकीन येथील डीएमआयसी परिसरातील पाच प्रतिभावान तायक्वांदो खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेपाळला रवाना झाले होते. ३० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेतला. या भारतीय संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. हाफिज इमरान यांनी केले.
या स्पर्धेत डॉ. हुमायू हाफिज इमरान यांनी सुवर्णपदक मिळवत आपल्या कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. त्यांच्या या यशामुळे बीडकीन, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल डॉ. हुमायू हाफिज इमरान यांचे महाराष्ट्र वाणी न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित