धरणगावात पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा; शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न

‘एमजीपी’ कंपनीविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शिवसेनेतर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले

धरणगावात पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा; शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न
धरणगावात पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा; शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न

धरणगाव (जळगाव), दि. १४ जुलै –

धरणगाव शहरात टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईनमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच, काही ठिकाणी पाईपलाईन लिकेजदेखील झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमजीपी’ कंपनीविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शिवसेनेतर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन कुंभकर्ण झोपेत गेलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी शहरातून ढोल वाजवत मिरवणूक काढून करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेनेचे उपनेते व रावेर लोकसभा नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री. गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख व धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, उपतालुका प्रमुख कृपाराम महाजन, शहरप्रमुख भागवत चौधरी, युवासेना शहरप्रमुख परमेश्वर महाजन, सुरेश महाजन, लीलाधर पाटील, सुभाष महाजन, माजी नगरसेवक उमेश महाजन, पंढरीनाथ महाजन, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, जिभाऊ पाटील, दिलीप महाजन, गजानन महाजन, राहुल रोकडे, शरद शिरसाट, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, उपशहर प्रमुख रंजीतसिंग ठाकूर, सचिन चव्हाण, नंदू पचेरवार, सोपान माळी, संजय भटूले यांचा समावेश होता.

शहरात खोदकामानंतरचे रस्ते न भरल्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासन आणि संबंधित कंपनीवर ताशेरे ओढले असून त्वरित दुरुस्तीची कामे करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

 "आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत कारण प्रशासन झोपेत आहे. नागरिकांचे हाल आता सहन होणार नाहीत. हा लढा केवळ रस्त्यांचा नाही, तर सामान्य माणसाच्या हक्कांचा आहे," असे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.

संपूर्ण रस्ता व्यवस्थापन सुरळीत न झाल्यास, शिवसेना पुन्हा आंदोलन छेडेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

(बातमी आवडली? वाचा, शेअर करा आणि अपडेट्ससाठी जोडलेच राहा!)