दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा मदतीचा हात; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचा धनादेश सुपूर्द

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा मदतीचा हात; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा मदतीचा हात; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १ :- राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान त्यांनी वेतनाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्यपाल बागडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रदान केला.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या या निर्णयातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित