दमा, सि.ओ.पी.डी. व श्वसन विकारांवरील मोफत शिबीर – ३ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे!

दमा, सि.ओ.पी.डी. व श्वसन विकारांवरील मोफत शिबीर – ३ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे!

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड (प्रतिनिधी) दि २ ऑगस्ट :– आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दमा, सि.ओ.पी.डी. आणि इतर श्वसन विकारांवर मोफत निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सिल्लोड येथील आयकॉन व्हिजिटिंग ओपीडी सेंटर, आजाद चौक, बायपास रोड येथे होणार आहे.

या शिबिरात श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. हफीज आर. देशमुख (एम.डी. चेस्ट मेडिसिन) रुग्णांची तपासणी करणार असून, गरजेनुसार स्पायरोमेट्रीद्वारे फुफ्फुसांची चाचणी केली जाणार आहे. पंप (Inhaler) वापरण्याची अचूक पद्धत शिकवण्यात येणार असून दमा व सि.ओ.पी.डी. विषयक माहिती पुस्तिकाही दिली जाईल.

शिबीरामध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी खालील त्रास असल्यास लाभ घ्यावा:

सततचा खोकला, सर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास

झोपताना किंवा हसताना शिट्टीसारखा आवाज

नाक व डोळ्यांची खाज, डोळ्यांतून पाणी

कानात खाज, वारंवार शिंका

थकवा झाल्यावर छातीत दडपण

महत्वाची सूचना: तपासणीसाठी येताना सर्व जुनी फाईल, एक्स-रे व चालू असलेली औषधे (इनहेलर/पंप) सोबत आणावीत.

अधिक माहितीसाठी संपर्क:

📞 90678 83101 / 94222 07834

वाचत रहा, आरोग्यदायी रहा!

(अशा मोफत शिबिरांची अधिक माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्या पोर्टलशी जोडलेले राहा.)