जळगाव महापालिका निवडणूक: AIMIMचे 8 मजबूत उमेदवार मैदानात; तीन प्रभागांत थेट लढत, शहरातील राजकीय वातावरण तापले
जळगाव दि १ :- शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने जोरदार तयारी करत आपली ताकद दाखवली आहे. प्रभाग क्रमांक 14, 17 आणि 18 मध्ये अधिकृत उमेदवारांची घोषणा करत AIMIMने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.
प्रभाग क्रमांक 14 (तांबापुरा परिसर)
या प्रभागातून AIMIMने समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
OBC गट: सरफराज फरीद शेख
महिला ओपन गट: रेहाना बी. आसिफ शेख (डल्ला), शकीला बी. अय्यूब खान पठाण
पुरुष ओपन गट: इमरान शब्बीर पटेल
प्रभाग क्रमांक 17 (मेहरूण परिसर)
17-B महिला ओपन गट: पटेल झैनब मोहम्मद इद्रीस
17-C पुरुष ओपन गट: खालिक खाटीक
17-D: माजी नगरसेवक रियाज बागवान
प्रभाग क्रमांक 18 (सुप्रीम कॉलनी)
महिला जनरल गट: पटेल शबनम जुबैर
मागील महानगरपालिका निवडणुकीत AIMIMने चार उमेदवार उभे केले होते, त्यापैकी तीन उमेदवार विजयी होऊन नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यावेळी पक्षाने थेट आठ उमेदवार मैदानात उतरवले असून, आणखी काही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मेट्रोपॉलिटन अध्यक्ष सैयद समीर आणि माजी जिल्हाध्यक्ष झिया बागवान यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिली आहे.
AIMIMने स्वतःला केवळ मुस्लिम समाजापुरते मर्यादित न ठेवता OBC, जनरल, महिला आणि युवा नेतृत्वाला संधी देत समावेशक राजकारणाचा स्पष्ट संदेश दिला आहे. महागाई, बेरोजगारी, नागरी सुविधा, अल्पसंख्याकांचे हक्क आणि विकासाच्या मुद्द्यांवर पक्ष आक्रमक व निर्भीड भूमिका घेत असल्याचेही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
या उमेदवार घोषणेमुळे जळगाव महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार असून, शहराच्या राजकारणात AIMIM एक महत्त्वाची ताकद म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
AIMIM महाराष्ट्र राज्य जळगावचे समन्वयक, छत्रपती संभाजीनगर येथील अॅड. अब्दुल रहमान अब्दुल आलम खान उमेदवारांना एबी फॉर्म वितरित करताना. सोबत झिया बागवान, सैयद समीर तसेच जळगावचे प्रसिद्ध व्यावसायिक साजिद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख उपस्थित दिसत आहेत.
— वाचत रहा, जळगावच्या राजकारणातील प्रत्येक हालचालीसाठी!