"जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवणारे लोकनेते — विलासराव देशमुख"

"जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवणारे लोकनेते — विलासराव देशमुख"

महाराष्ट्र वाणी विशेष 

दिनांक १४ ऑगस्ट :- लोकशाही व्यवस्थेत लोकांच्या मनात घर करणं हेच सर्वात मोठं यश असतं, आणि हे यश लोकनेते विलासराव देशमुख यांनी त्यांच्या जनसंपर्क, प्रामाणिक कार्य आणि दिलखुलास स्वभावाने मिळवलं.

एक कार्यक्षम प्रशासक, कुशल रणनीतीकार आणि माणसात माणूस शोधणारे नेता म्हणून त्यांची ओळख आजही जनतेच्या मनात तितकीच जिवंत आहे. सरपंचापासून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरला.

प्रगतशील विचारसरणी आणि दूरदृष्टीच्या जोरावर देशमुख साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या जीवनकार्यामुळे ते सदैव जनतेच्या स्मरणात राहतील.