छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 16 जानेवारीला; 4 ठिकाणी मतमोजणी, कडक पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अंतर्गत दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासनाने सविस्तर नियोजन केले असून, शहरातील एकूण 29 प्रभागांची मतमोजणी 4 ठिकाणी करण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी यासाठी RO निहाय फेऱ्या, टेबल्स आणि मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतमोजणी फेऱ्या व टेबल्स निश्चित करण्यात आले असून, आवश्यक मनुष्यबळ आणि सुरक्षा यंत्रणा तैनात राहणार आहे.
4 ठिकाणी होणार मतमोजणी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान झाले असून, त्याचा निकाल पुढील ठिकाणी जाहीर केला जाणार आहे —
गरवारे हायटेक फिल्म, एमआयडीसी, चिकलठाणा
प्रभाग : 01, 02, 07, 08, 09, 10, 11, 23, 24, 25
बंदोबस्त प्रभारी : पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2
शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा
प्रभाग : 15, 16, 17, 26, 28, 29
बंदोबस्त प्रभारी : पोलीस उप आयुक्त
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, स्टेशन रोड
प्रभाग : 18, 19, 20, 21, 22, 27
बंदोबस्त प्रभारी : पोलीस उप आयुक्त
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड
प्रभाग : 03, 04, 05, 06, 12, 13, 14
बंदोबस्त प्रभारी : पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2
कडक पोलीस बंदोबस्त
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः देखरेख ठेवणार आहेत.
👉 शहराचा कारभार ठरवणाऱ्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… निकालाचे थेट अपडेट्स वाचा ‘महाराष्ट्र वाणी’वर!