“छत्रपतींचा अपमान सहन होणार नाही!” — बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात ‘जोडेमारो’ आंदोलन

“छत्रपतींचा अपमान सहन होणार नाही!” — बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात ‘जोडेमारो’ आंदोलन
“छत्रपतींचा अपमान सहन होणार नाही!” — बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे क्रांती चौकात ‘जोडेमारो’ आंदोलन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. २५ 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज क्रांती चौक येथे जोरदार ‘जोडेमारो’ आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन पार पडले.

नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. यावेळी बोलताना शेख युसूफ यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “छत्रपती शिवाजी महाराज समजण्याची लायकी बागेश्वर बाबाची नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मोहन भागवत यांनी या प्रकरणी माफी मागावी,” अशी मागणी केली. तसेच संबंधित भोंदू बाबावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

आंदोलनादरम्यान “भोंदू बाबा हाय हाय”, “होश में आओ” अशा जोरदार घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला. संतप्त कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत सरकारलाही लक्ष्य केले.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल, इंजि. विशाल बन्सवाल, मोईन इनामदार, सूर्यकांत गरड, विश्वास औताडे, राहुल सावंत, असदउल्ला शकील, इंजि. इफ्तिकार शेख, डॉ. सिकंदर शेख, योगेश थोरात, दिलीप भोसले, संजय धर्मरक्षक, रेखा वाहतुळे, गौरव जैस्वाल, बाबासाहेब पवार, इरफान पठाण, शेख फय्याजोद्दीन, प्रकाश सानप, कल्याण चव्हाण, पप्पूराज ठूबे, सलीम इनामदार, सलमान खान, रमेश काळे, अजय डिडोरे, शिरीष चव्हाण, शुभम साळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“छत्रपतींच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेली ही लढाई आता अधिक तीव्र होणार का?”