खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंठा येथे वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम

खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंठा येथे वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम
खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंठा येथे वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम

महाराष्ट्र वाणी न्युज 

अजिंठा (ता. सिल्लोड) दि १९ जुलै :- जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा छत्रपती संभाजीनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याणराव काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंठा येथील हमदर्द चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नॅशनल इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे खैरून्निसा उर्दू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात सिल्लोड काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व हमदर्द ट्रस्टचे संस्थापक इकबाल अहमद सर, प्राचार्य झहीर अहमद सर, मोहम्मद खुसरो सर, शेख हमझा, शेख तल्हा, शेख युनूस, मुख्याध्यापक शेख अफसर, जावेद सौदागर, शेख रिझवान, शेख आसिफ, मोईन अहमद, सैयद वसीम, शेख शफीक, शेख युसुफ, तौफिक खाटीक, शेख इस्माईल, शेख सलीम, संजय जाधव, मारुती गव्हाणे, याकूब शेख, इस्माईल शेख, युनूस सौदागर यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक भान आणि प्रेरणा निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.

"समाजसेवेचा वारसा पुढे नेत शिक्षण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात सकारात्मक पाऊल" – हमदर्द ट्रस्टची अभिनंदनीय भूमिका