‘उबाठा’कडून मोठा निर्णय! विधान परिषदेवर अंबादास दानवे यांनाच संधी
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २९ :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा रंगात असतानाच, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून विधान परिषदेचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे आता अंबादास दानवे यांचा आवाज पुन्हा एकदा विधान परिषदेत घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील अनुभव, आक्रमक भूमिका आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे उबाठा पक्षाने आपली पुढील राजकीय रणनीती स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.
👉 राजकारणातील या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा!