इकरा थीम महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; ध्वजारोहण, नशामुक्तीची शपथ
महाराष्ट्र वाणी न्युज
मेहरूण, जळगाव दि १५ :– इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इकरा शिक्षण संस्थेचे संचालक श्री. अब्दुल अज़ीज सालार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान, उपप्राचार्य डॉ. वकार, डॉ. तनवीर खान, श्री. अशफाक पठाण यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सालार यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशप्रेम, एकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेत समाजहिताचा संकल्प केला.
"देशासाठी आपले योगदान देण्याची वेळ आजही तेवढीच महत्त्वाची आहे," — श्री. अब्दुल अज़ीज सालार
🇮🇳 देशप्रेमाची शपथ, नशामुक्त समाजाची वाटचाल – ‘महाराष्ट्र वाणी’ सोबत रहा, बातम्यांच्या प्रत्येक क्षणात!