आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 1.84 कोटी वसूल

आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 1.84 कोटी वसूल

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि १४ ऑगस्ट: 

आज दि 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून थकीत 1.84 कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आले.

आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दशका पासून प्रलंबित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकरण आज निकाली काढण्यात आले. अध्यक्ष बाजार समिती श्री पठाडे यांनी रुपये 1.84 कोटीचे धनादेश आयुक्त जी श्रीकांत यांचे कडे सुपूर्द केले.

 उपरोक्त पत्करणी उप आयुक्त तथा कर निर्धारक व संकलक विकास नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक ५ चे वसुली कर्मचारी यांनी कार्यवाही केली.

 *झोन 9 ची पाहणी* 

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून दिनांक 16 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत थकित मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीवर 95 टक्के सूट देण्याची योजना "शासती से आजादी' या माथाडीखाली महानगरपालिकेने राबवली आहे. याशिवाय नागरिकांची सोयीसाठी ऑनलाइन कर भरणे आणि महानगरपालिका चॅटबोट नंबर देखील जाहीर करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा आढावा घेत जी श्रीकांत यांनी आज झोन क्रमांक 09 ची पाहणी केली आणि आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी कर भरण्यासाठी आलेले एका नागरिकाला ऑनलाइन कर सुविधा बाबत विचारले . त्यांनी त्या नागरिकाच्या फोनवर ऑनलाइन कर कसा भरता येते हे शिकवले आणि त्यानी आपले कर ऑनलाइन भरले.