आमदार गजाननभाऊ लवटे यांच्या हस्ते काँग्रेसचे महासचिव संजयभाऊ बेलोकार यांचा वाढदिवस सत्कार
महाराष्ट्र वाणी न्युज
दर्यापूर दि २५ :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस कमिटीचे महासचिव मा. संजयभाऊ बेलोकार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. गजाननभाऊ लवटे यांनी शाल व फुलगुच्छ देऊन संजयभाऊंचा सत्कार केला व त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मा. सुनिलभाऊ गावंडे (सभापती, कृ.उ.बा.स. दर्यापूर), मा. सुधाकरभाऊ भारसाकळे (तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी), मा. बबनराव विल्हेकर (विधानसभा संघटक), मा. दिपकभाऊ बगाडे (उपशहरप्रमुख), मा. मोहनभाऊ बायसकर (सरपंच) यांच्यासह शिवसेना-युवासेना व काँग्रेस कमिटीचे आजी-माजी पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"सामाजिक कार्याची प्रेरणा देणारा वाढदिवस सोहळा दर्यापूरवासीयांच्या मनात कायमची आठवण बनला."