२४५ अतिक्रमणांचा धडाका! दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट मार्ग मोकळा; उद्या सिडकोकडे मोर्चा

अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तासह ही कारवाई

२४५ अतिक्रमणांचा धडाका! दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट मार्ग मोकळा; उद्या सिडकोकडे मोर्चा
२४५ अतिक्रमणांचा धडाका! दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट मार्ग मोकळा; उद्या सिडकोकडे मोर्चा

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ७ जुलै:- महानगरपालिकेने आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान तब्बल २४५ अतिक्रमणांचे उच्चाटन करून जोरदार कारवाईचा इशारा दिला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावर आणि अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तासह ही कारवाई पार पडली.

अतिक्रमणांमध्ये हॉटेल्स, दुकाने, शेड, जाहिरात फलक, गॅरेज, कंपाऊंड, कमानी यांचा समावेश होता. या मोहिमेसाठी ३५० महापालिका कर्मचारी व २५० पोलीस, तसेच १५ जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, अग्निशमन व रूग्णवाहिका वाहनं तैनात करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, बार्बेरियन जिमच्या मालकाकडून १० लाख रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले आहे.

उद्या हर्सूल टी पॉईंट ते सिडको बस स्टँड या मार्गावर अशीच अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संतोष वाहुळे यांनी दिली.

👉 “मोकळ्या रस्त्यांसाठी आता बेकायदेशीर बांधकामांची रजा!”