२० वर्षांनंतर कन्नड नगरपालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

२० वर्षांनंतर कन्नड नगरपालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
२० वर्षांनंतर कन्नड नगरपालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

महाराष्ट्र वाणी

कन्नड | प्रतिनिधी दि २ :- कन्नड नगरपालिकेच्या वतीने तब्बल २० वर्षांनंतर शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

वैद्यकीय, विधी आणि संरक्षण क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आदित्य शेखर मोरे, गोरोबा (अग्निवीर), डॉ. तेजस राणासिंग चव्हाण (एमबीबीएस), डॉ. साजेब निसार शेख (एमबीबीएस), डॉ. रेहान गयाज पटेल (एमबीबीएस) तसेच सोहेल फयास खान (बीए एलएलबी) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद सेठ यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची नगरपालिकेची परंपरा पुन्हा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

👉 "गुणवंतांचा सन्मान म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी; कन्नड नगरपालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे."