हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये: सुट्टीतही कामकाज! ८ ते १४ डिसेंबरला निर्णयमंत्र

हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये: सुट्टीतही कामकाज! ८ ते १४ डिसेंबरला निर्णयमंत्र

महाराष्ट्र वाणी 

Maharashtra Winter Session 2025 : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ ते १४ डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. विशेष म्हणजे, १३ डिसेंबर (शनिवार) आणि १४ डिसेंबर (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वानिमित्त खास प्रकाशन

भारताच्या संविधानाच्या अमृत महोत्सवी ऐतिहासिक वाटचालीनिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत खास चर्चा झाली होती. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि. स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राने तयार केले आहे.

हे पुस्तक ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

महत्त्वपूर्ण नेत्यांची उपस्थिती

विधानभवनात झालेल्या या बैठकीस

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे,

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री अजित पवार,

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,

उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील,

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.

नागपूरच्या हिवाळ्यात… निर्णयांचे तापमान मात्र वाढणारच!