स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात अभिवादन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन येथे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार एम. एम. शेख, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश सरचिटणीस रवी दादा काळे, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, आतिष पितळे, संदीप बोरसे, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, विनोद तांबे, सुर्यकांत गरड, मनोज शेजुळ, संतोष मेटे, प्रकाश सानप, अनिता भंडारी, रेखा वहाटुळे, उषा खंडागळे, मंजुषा लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्व. विलासराव देशमुख हे जनतेच्या हृदयात घर करणारे, विकासाचे शिल्पकार आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांचे कार्य व विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात.
नेतृत्वाची अशी उंची, जी काळही विसरू शकला नाही!