सिल्लोडमध्ये भाजपाचा दारुण पराभव! अब्दुल सत्तारांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध – समीर सत्तारांचा 23,500 मतांनी विक्रमी विजय

सिल्लोडमध्ये भाजपाचा दारुण पराभव! अब्दुल सत्तारांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध – समीर सत्तारांचा 23,500 मतांनी विक्रमी विजय
सिल्लोडमध्ये भाजपाचा दारुण पराभव! अब्दुल सत्तारांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध – समीर सत्तारांचा 23,500 मतांनी विक्रमी विजय

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड दि २१ :- नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला जनतेने जबरदस्त झटका दिला असून, शहरातील मतदारांनी विकास, विश्वास आणि सर्वधर्मसमभावाचा स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने आमदाा अब्दुल सत्तार यांच्या  नेतृत्वात 28 पैटी 25 जागेवर  विजय मिळवत नगरपरिषदेवर पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर सत्तार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात भाजपाचे मनोज मोरेल्लु आणि वंचित बहुजन आघाडीचे बनेखा पठाण रिंगणात होते. मात्र, सिल्लोडच्या जनतेने विरोधकांचे सर्व गणिते उधळून लावत अब्दुल समीर सत्तार यांना तब्बल २३,५०० पेक्षा अधिक मतांनी विक्रमी विजय दिला.

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सिल्लोड नगरपरिषदेत आमदार अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता असून, यावेळीही मतदारांनी हेच समीकरण कायम ठेवले आहे. 

सिल्लोडमधील अब्दुल सत्तार यांचे राजकीय बळ तोडण्यासाठी विरोधकांनी निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्ष मतदानात जनतेने पुन्हा एकदा आमदार अब्दुल सत्तार यांच्यावरच विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले.

“आमची तयारी २८ पैकी २८ जागांची होती, मात्र ३ उमेदवार पराभूत झाले. शेवटी विरोधकही जिवंत असले पाहिजेत,” अशी मिश्कील प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली व आत्मविश्वासही व्यक्त केला. भाजपासाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जात असून, सिल्लोडमध्ये त्यांची रणनीती सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

सिल्लोडने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले – नेतृत्व बदलत नाही, विश्वास बदलत नाही!