सिल्लोडमध्ये उत्साहपूर्ण मतदान! आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदार आणि प्रशासनाचे मानले आभार

सिल्लोडमध्ये उत्साहपूर्ण मतदान! आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदार आणि प्रशासनाचे मानले आभार

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड दि २ :- सिल्लोड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदानाची नोंद झाली. लोकशाहीच्या या महोत्सवात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झालेल्या सर्व सिल्लोडकर मतदारांचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

आमदार सत्तार म्हणाले की, “लोकशाही हा आपल्या देशाचा सर्वात मोठा उत्सव आहे. सिल्लोडच्या नागरिकांनी जबाबदारीने मतदान करून लोकशाही बळकट केली आहे. प्रत्येक मतदाराचे मनापासून आभार.”

तसेच, मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, तसेच या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांनी शांततेत, सजगतेने मतदान केल्याने संपूर्ण निवडणूक सुरळीत पार पडली. आता सर्वांच्या नजरा निकालावर खिळल्या आहेत.

शेवटी आमदार सत्तार यांनी नागरिकांना लोकशाहीच्या या प्रवासात अशाच प्रकारे सहभागी रहावे, विकासाच्या प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहन केले.

“तुमचे एक मत… सिल्लोडच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी उडी!”