सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीची नविन कार्यकारिणी जाहीर
सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ६ :– सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीची नव्याने पुनर्रचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांनी विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून नव्या संघटनेच्या गठनाची प्रक्रिया सुरू केली होती.
प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच जिल्हाध्यक्ष किरणभाऊ पाटील डोणगावकर यांच्या मान्यतेनंतर ही नवी कार्यकारिणी अंतिम करण्यात आली. कार्यकारिणी जाहीर करताना पक्षनिरीक्षक डॉ. जफर खान, तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इकबाल अहमद सर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, जियाउल हक, वसीम देशमुख, अनिस शेख, संजय जाधव, सलीम शेख, तौफिक शेख, शफीक शेख, सरफराज शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. नव्या कार्यकारिणीमुळे सिल्लोड तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक संघटित, गतिमान आणि जनतेच्या, शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र वाणी – लोकांच्या मनातील बातमी!