सामाजिक उपक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस साजरा – वृक्षारोपण, फळ वाटप, अनाथाश्रमात खाऊ वाटपाने पुण्यात राष्ट्रवादीचा उपक्रम

सामाजिक उपक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस साजरा – वृक्षारोपण, फळ वाटप, अनाथाश्रमात खाऊ वाटपाने पुण्यात राष्ट्रवादीचा उपक्रम
सामाजिक उपक्रमांनी अजितदादांचा वाढदिवस साजरा – वृक्षारोपण, फळ वाटप, अनाथाश्रमात खाऊ वाटपाने पुण्यात राष्ट्रवादीचा उपक्रम

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे दि २२ जुलै :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, रुग्णांना फळ वाटप, तसेच अनाथाश्रमात खाऊ वाटप करण्यात आले.

पुणे कॅम्प येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप, अक्रूर कुदळे आणि प्रदीप देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात पर्यावरण जपण्याचा संदेश देत कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच, एका अनाथाश्रमात जाऊन लहान मुलांना खाऊ वाटून अजितदादांच्या कार्यप्रवृत्तीप्रमाणे समाजाशी नाळ जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेश इंद्रसेन जाधव यांनी केले होते.

कार्यक्रमाला कार्याध्यक्ष राहुल तांबे, ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, दिनेश परदेशी, रोशनारा कुरेशी, हरीश लडकत, महेंद्र लालबिगे, अयाज शेख, शब्बीर शेख, ईस्त्याक बागवान, चेतन मोरे, सुनिता बडेकर, दीपक मस्के, वाहिद बियाबानी, फरदीन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟢 अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी उपक्रम – समाजसेवेचा खरा अर्थ अशाच कृतींमधून दिसतो!