‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरेंचा इशारा – “दुबार मतदारांना जागेवरच बडवा!”

‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरेंचा इशारा – “दुबार मतदारांना जागेवरच बडवा!”
‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरेंचा इशारा – “दुबार मतदारांना जागेवरच बडवा!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १ :- राज्यभरातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. महाविकास आघाडीसह अनेक विरोधी पक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चात भाषण करत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आणि मतदार याद्यांमधील घोळावरून कार्यकर्त्यांना थेट “खळ्ळखट्याक करा” असा संदेश दिला.

🗳️ मतदार याद्यांतील गोंधळावरून ठाकरे संतापले

फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत निघालेल्या या मोर्चात राज ठाकरे म्हणाले,

> “सगळेच पक्ष म्हणतायत की मतदार याद्यांमध्ये दुबार नावे आहेत — आम्ही, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, अगदी भाजपचेही लोक. मग निवडणुका घाईघाईत का घेताय? आधी याद्या स्वच्छ करा, मग निवडणुका घ्या.”

त्यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “निवडणुका फिक्स करून ठेवण्याची पद्धत बंद झाली पाहिजे.”

⚡ “दुबार-तिबार मतदार दिसले तर...”

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट सूचना दिल्या 

 “जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा याद्या नीट तपासा. आणि जर दुबार मतदार दिसले, तर तिथेच फोडून काढा, बडवून पोलिसांच्या हवाली करा. नाहीतर हे वठणीवर येणार नाहीत.”

त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

📜 “हे बघा पुरावे!”

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक पुरावे सादर केले.

त्यांनी मतदारसंघानुसार दुबार मतदारांची आकडेवारीही मांडली —

मतदारसंघ एकूण मतदार दुबार मतदार

मुंबई उत्तर १७,२९,४५६ ६२,३७०

मुंबई उत्तर-पश्चिम १६,७४,८६१ ६०,२३१

मुंबई उत्तर-पूर्व १५,९०,७१० ९२,९८३

मुंबई उत्तर-मध्य १६,८१,०४८ ६३,७४०

मुंबई दक्षिण-मध्य १४,३७,७७६ ५०,५६५

मुंबई दक्षिण १५,१५,९९३ ५५,२०५

नाशिक १९,३४,३४९ ९९,६७३

मावळ १९,८५,१७२ १,४५,६३६

पुणे १७,१२,२४२ १,०२,००२

ठाणे — २,०९,९८१

राज ठाकरे म्हणाले,

 “एवढे पुरावे दिल्यानंतरही सत्ताधारी कोर्टाचा आदेश सांगून घाईत आहेत. पाच वर्षं निवडणुका झाल्या नाहीत, आणखी एक वर्ष झाल्या नाहीत तर काय बिघडलंय? पण ज्यांनी ‘आधीच निकाल ठरवलेत’, त्यांचं काय?”

🔥 “ही निवडणूक नाही, मॅच फिक्स आहे”

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही थेट प्रश्न उपस्थित केला —

 “नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवलेत, काहीजण सुलभ शौचालयात नोंदवलेत! हा मतदाराचा अपमान नाही का? उन्हातान्हात उभा राहून मतदान करणाऱ्या नागरिकाचा आवाज कुणी ऐकणार नाही का? ही निवडणूक नाही, मॅच आधीच फिक्स केलेली आहे.”

🟠 “मतदाराचा सन्मान राखा, नाहीतर रस्त्यावर उतरू!” — असा इशारा देत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

👉 मतदार यादी स्वच्छ नसल्यास, राज ठाकरेंचा “सत्याचा मोर्चा” आता आणखी तापणार!