"शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, मदत पोहोचवा – आमदार अब्दुल सतार यांचे प्रशासनाला आदेश"

"शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, मदत पोहोचवा – आमदार अब्दुल सतार यांचे प्रशासनाला आदेश"
"शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, मदत पोहोचवा – आमदार अब्दुल सतार यांचे प्रशासनाला आदेश"

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि. २३ :- सोयगाव मतदारसंघातील सोयगाव येथे पंचायत समितीच्या बचत भवनात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार अब्दुल सतार यांनी भूषवले.

गेल्या तीन-चार वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यातील नदी-नाले काठावरील गावे, शेतीपिके तसेच रस्ते व पूल मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सतार यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत सांगितले की –

🔹 प्रशासनाने तातडीने व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.

🔹 एकाही बाधित शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नये.

🔹 अतिवृष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणीही अधिकारी मुख्यालय सोडू नये.

यावेळी आमदार सतार म्हणाले की, "शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्वरित भरून काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. अधिकारी व विभागांनी योग्य समन्वयाने कार्य केल्यासच मदत वेळेत पोहोचेल."

बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार मनीषा मेने, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, नायब तहसीलदार संभाजी देशमुख, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले, पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजय टाकसाळे, प्रीतम राठोड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक शाखावर, शाखा अभियंता दीपक मोगडे, राजेश राजगुरू, जलसंधारण अधिकारी सूर्यकांत निकम, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा, पाणी पुरवठा विभागाचे विजय वाघ आदी उपस्थित होते.

तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, कृउबा समितीचे संचालक दारासिंग चव्हाण, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, नगरपंचायत गटनेता अक्षय काळे, गोपीचंद जाधव, लखुसिंग नाईक, कुणाल राजपूत यांच्यासह विविध गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नुकसानग्रस्त शेतकरी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला तरच खरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.