शिक्षकांना तुम्हीच मान्यता दिल्या, कागदपत्रे मागून शिक्षकांना वेठीस धरू नका – आमदार विक्रम काळे

शिक्षकांना तुम्हीच मान्यता दिल्या, कागदपत्रे मागून शिक्षकांना वेठीस धरू नका – आमदार विक्रम काळे

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १९ :- राज्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील वेतन घेणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये आधीच उपलब्ध असून, त्यांना दिलेली मान्यता ही आवश्यक कागदपत्रांच्या तपासणीनंतरच झाली आहे. त्यामुळे पुन्हा जुनी कागदपत्रे मागून शिक्षकांचे वेतन थांबवणे अन्यायकारक ठरेल, असे स्पष्ट मत शिक्षक विभागाचे आमदार विक्रम काळे यांनी नोंदवले.

शिक्षण आयुक्तांकडून शिक्षकांची माहिती अपलोड करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी शालार्थ आयडी देताना नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, शालेय समिती ठराव व संच मान्यतेतील मंजूर पदे यांची संपूर्ण तपासणी शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेली आहे. या सर्व कागदपत्रांच्या प्रती शिक्षण कार्यालयांत सादर झालेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही शंका असल्यास शिक्षण विभागाने कार्यालयातून पडताळणी करावी, शिक्षकांना वेठीस धरू नये, असे काळे यांनी पत्राद्वारे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना स्पष्ट केले.

काळे म्हणाले की, "जुनी माहिती पुन्हा सादर करण्याचे कारणच नाही. शिक्षकांचे वेतन पूर्ववत सुरू ठेवावे. अन्यथा हा अन्यायकारक निर्णय ठरेल."

"शिक्षकांच्या हक्कासाठी आवाज बुलंद – आमदार विक्रम काळेंची ठाम भूमिका!"